कोल्हापूरात शाहू महाराज 1 लाखांनी विजयी, संजय मंडलिक यांचा पराभव

कोल्हापूरात शाहू महाराज 1 लाखांनी विजयी, संजय मंडलिक यांचा पराभव

कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले आहेत. संजय मंडलिक यांचा पराभव झाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आज देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा दिवस आहे. 43 दिवस चाललेल्या 18 व्या लोकसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. राज्यातील 48 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आजचा दिवस सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा दिवस आहे.

कोल्हापूरमध्ये निवडणूक लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक रिंगणात होते. तर आता कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले आहेत. संजय मंडलिक यांचा पराभव झाला आहे.

शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला होता. मात्र, शाहू महाराजांनी विजयाकडे केलेली वाटचाल पाहता कोल्हापुरात मान आणि मत गादीला दिल्याचे स्पष्ट होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com