आंदोलनस्थळी गोळीबार झाला नाही; शंभूराज देसाईंचा दावा, आंदोलकांपेक्षा जखमी पोलिसांची संख्या अधिक

आंदोलनस्थळी गोळीबार झाला नाही; शंभूराज देसाईंचा दावा, आंदोलकांपेक्षा जखमी पोलिसांची संख्या अधिक

अंतरवलीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला आहे. यावर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अंतरवलीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत हवेत गोळीबार केला आहे. यावर सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत असून निषेध करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना उत्तर दिले आहे.

आंदोलनस्थळी गोळीबार झाला नाही; शंभूराज देसाईंचा दावा, आंदोलकांपेक्षा जखमी पोलिसांची संख्या अधिक
शिंदे-फडणवीसांवर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, आश्वासन न पाळल्यानं...

शंभूराज देसाई म्हणाले की, काल जालना जिल्ह्यातील गावामध्ये मराठा आंदोलन सुरू असताना आंदोलन थोडं प्रक्षुब्ध झाले. आम्ही याचे कधीच समर्थन करणार नाही. आंदोलन ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ का आली याची चौकशी करावी. प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की सर्वच घटकांनी आणि सर्वच पक्षांनी मराठा आरक्षण याला पाठिंबा दिला तरीपण असं का घडत आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षण का देत आहे हे समजून घेतले असते तर असं झाले नसते. क्यूरेटिव पिटीशन हे सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे. त्यासाठी राज्य सरकारने अनेक बैठका घेतल्या आहेत. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. यावर आमचे एकमत आहे. पण हे सर्व सुप्रीम कोर्ट यांच्या प्रोसेस मधून जावं लागतं. राज्य सरकार मराठा आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. कोणत्याही मराठा संघटना आणि तरुणांनी भडकावू वक्तव्याचा बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आंदोनस्थळी गोळीबार झाला नाही. पोलीस सर्वात पहिले समजवून सांगतात आणि त्यानंतर सौम्य लाठीचार्ज करतात. जखमी आंदोलकांपेक्षा जखमी पोलिसांची संख्या खूप जास्त आहे. सामान्य लोकांपेक्षा चार पटीने अधिक पोलीस जखमी झाले आहेत. मीडिया कर्मचारी देखील जखमी झाले आहेत, असे शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

शरद पवारांना कोणी काय माहिती देत आहेत याबद्दल मला माहित नाही. जरांगे पाटील यांना चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रित केले होते. आम्ही दुर्लक्ष केले नाही, असे उत्तर शंभूराज देसाईंनी शरद पवारांच्य टीकेला दिलं आहे. तर, घरी बसणारे आज आम्हाला शासन आपल्या दारी यावर टीका करतात. दारोदारी जाणारं मुख्यमंत्री त्यांना माहित नाही म्हणून ते असं बोलतात, असा पलटवारही त्यांनी उध्दव ठाकरेंवर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com