उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी चेहरा, हे शरद पवारांना विचारलं का? शंभूराज देसाईंचा खोचक सवाल

उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी चेहरा, हे शरद पवारांना विचारलं का? शंभूराज देसाईंचा खोचक सवाल

2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला.

सातारा : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी चेहरा असतील, तर हे शरद पवारांना विचारलं आहे का, असा खोचक सवाल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विचारला आहे. दिल्लीला जाणार याचा आम्हाला आनंद आहे, पण कधी बाहेर पडले का? असेही देसाईंनी विचारले आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी चेहरा, हे शरद पवारांना विचारलं का? शंभूराज देसाईंचा खोचक सवाल
औरंगजेबासोबत आमचा काही संबंध नाही, कबर हलवायची असेल तर... : इम्तियाज जलील

शंभूराज देसाई म्हणाले की, खेडमध्ये काल शिमगा सभा झाली. दर्जा घसरलेले भाषण काल ऐकायला मिळाले. खालच्या थराच्या भाषणाची अपेक्षा नव्हती, राज्यातील शिवसैनिकांची घोर निराशा करणारे भाषण होते. ठाकरेंच्या भाषेचा निषेध करतो. आम्हालाही बोलता येत हसडण्याची ताकद आमच्यात आहे. खालची लोक बोलत होती ते आम्ही दुर्लक्ष करत होतो. राणे 10 आमदारांना घेऊन बाहेर पडले त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. आमच्या नेत्यांच्या बाबतीत पुन्हा वक्तव्य केलं तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी चेहरा असतील तर हे शरद पवारांना विचारलं आहे का? निवडणुकीत आता मोदींचा फोटो नसणार आहे. स्वतःचा आणि पवारांचा फोटो लावावा लागेल. पवारांचा सल्ला घेतला का? दिल्लीला जाणार आम्हाला आनंद आहे, कधी बाहेर पडले का, असे खोचक प्रश्न देसाईंनी विचारले आहे.

उध्दव ठाकरेंनी सभा घ्याव्यात, हे अडीच वर्षे करायला पाहिजे होते ते आता करत आहेत. कालची गर्दी जमवली गेली होती. कालच्या सभेला आमच्याकडच्या ठाकरे गटाच्या पण गाड्या गेल्या होत्या. शक्ती प्रदर्शन करायला गर्दी जमवली होती. एकनाथ शिंदे जिथं जातात तिथं मोठ्या संख्येने लोक जमतात. 19 तारखेला आमची गर्दी समजेल. राजघराण्यावर राऊत बोलले याची मला खंत वाटली. साताऱ्यात दोन-दोन राजे असताना राऊत बोलतात. सातरवासियांनी निषेध करायला हवा होता याची मला खंत आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com