राजकारण
अजित पवार व शरद पवारांनी एकत्र यावं; बॅनरची चर्चा
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.
चंद्रशेखर भांगे, पुणे
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार जाणार नाही आहेत. अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीला दुसऱ्यांदा जाणं टाळलं आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांचे मनो मिलन व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये इतर पदाधिकारी ही उपस्थित असणार आहेत. गेटवर एक बॅनर लावण्यात आला असून या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे. लहान तोंडी घेतो मोठा घास तुमच्या मनोमिलनाची लागली आस असा मजकूर या बॅनरवर आहे. सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दादा आणि पवारांचे नेतृत्व हवं आहे. असं अजित घुले यांनी सांगितलं.