मविआत बिघाडी? 'त्या' विधानावर शरद पवारांचे अखेर स्पष्टीकरण

मविआत बिघाडी? 'त्या' विधानावर शरद पवारांचे अखेर स्पष्टीकरण

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

मुंबई : मविआ आज आहे, उद्या मात्र सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. तर, सत्ताधाऱ्यांनी मविआवर तोंडसुख घेण्यासही सुरुवात केली होती. परंतु, शरद पवार यांनी अखेर या विधानावर स्पष्टीकरण देत चर्चा फेटाळून लावल्या आहेत. वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मविआत बिघाडी? 'त्या' विधानावर शरद पवारांचे अखेर स्पष्टीकरण
मविआ आज आहे, उद्या सांगता येणार नाही; शरद पवारांच्या विधानाचा भुजबळांनी सांगितला अर्थ

काय म्हणाले होते शरद पवार?

एकत्र लढण्याची इच्छा आहे पण इच्छा पुरेशी नसते. कारण जागावाटप त्यातले प्रश्न याबाबत अजून चर्चा झालेली नाही असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलं. त्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीचं भविष्य सध्या तरी अंधातरी दिसतंय. कोणी फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी करावं आम्ही आमची भूमिका घ्याची ती घेऊ, असे शरद पवार म्हणाले होते. यावरुन तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

यानंतर शरद पवार यांनी स्वतः या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com