महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही; शरद पवारांचा टोला

महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही; शरद पवारांचा टोला

शरद पवार यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर महापुरुषांच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर महापुरुषांच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही. पण, महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, अशी टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही; शरद पवारांचा टोला
बावनकुळे म्हणाले 'औरंगजेबजी'; व्हिडीओ शेअर करत मिटकरींचा भाजपावर निशाणा

शरद पवार म्हणाले की, सामान्य माणसाला महागाईच्या गर्तेत ढकलून देण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत. या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे. अशा सरकारला आम्हाला पुन्हा संधी द्यायची नाही. इथले उद्योग बाहेर जात आहे. याच कारण बेरोजगारी वाढत आहे. त्याचे सामाजिक परिणाम दिसत आहेत.

जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवली जात आहे. नोकरी नाही म्हणून लग्नासाठी मुलांसाठी मुली मिळत नाही. या बेरोजगारीचा परिमाण मुलांची लग्न थांबण्यावर झालाय. लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळवल जात आहे. कधी जातीच नाव, कधी धर्माच नाव याचा वापर केला जात आहे, अशीही टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

महाराष्ट्रातील माणूस कधीही भीक मागत नाही; शरद पवारांचा टोला
'त्या' विधानावरुन सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण

महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही. परंतु, एका नेत्याने सांगितले महापुरुषांनी भीक मागितले. पण, महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिमतीने, कष्ट करून संकटावर मात करतो, असा निशाणा त्यांनी चंद्रकात पाटलांवर साधला आहे.

दरम्यान, 50 टक्के आरक्षण विधानसभा, लोकसभा इथं मिळाल पाहिजे. स्त्रियांना संधी द्या त्या तुम्हाला कर्तृत्व दाखवतील, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com