निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची बैठक

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची बैठक

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले होते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतीत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे.

याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची बैठक पार पडणार आहे. पुण्यात सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. बैठकीला शहरातील शरद पवार गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार असल्याचे समजते.

शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. निकालानंतर पुढील दिशा काय असणार यावर बैठकीत होणार चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची बैठक
पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी 'पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे'! - रोहित पवार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com