काल अजितदादांच्या शपथविधीला हजर, आज 'ते' आमदार शरद पवारांसोबत

काल अजितदादांच्या शपथविधीला हजर, आज 'ते' आमदार शरद पवारांसोबत

शरद पवार दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरले असून सातारा दौऱ्यावर पोहोचले असून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सातारा : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यानंतर शरद पवार दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरले असून सातारा दौऱ्यावर पोहोचले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी अजित पवार यांच्या शपथविधीला असणारे आमदार आज शरद पवारांसोबत दिसत आहेत.

काल अजितदादांच्या शपथविधीला हजर, आज 'ते' आमदार शरद पवारांसोबत
Political Crisis : राज्यात आणखी छोटे-मोठे राजकीय भूकंप होणार; 'या' भाजपा नेत्याचा दावा

राजकीय भूकंपानंतर शरद पवार आज प्रथमच सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावेळी आता शरद पवारांसोबत आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते. हे तीनही आमदार काल अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु असून शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल, हलगी वाजवत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत केलं आहे. आम्ही पवार साहेबांसोबत असल्याचा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी पृथ्वीराज चव्हाणही शरद पवारांच्या स्वागताला उपस्थित होते.

शरद पवारांनी कराड येथील प्रीतीसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यानंतर ते साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर, साताऱ्यात शरद पवारांची सभा होणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, फुटीर आमदारांबद्दल बोलतना जयंत पाटील यांनी आमदारांना राष्ट्रवादी पक्षातून जाण्यापासून एका मर्यादेपर्यंतच थांबवू. त्यानंतर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. अनेक जण संभ्रममुळे तिकडे गेले होते. ते सगळे मला फोन करत आहेत. पवार साहेबांबरोबर लोक आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com