राजकारण
कोल्हापुरात धडाडणार शरद पवारांची तोफ; कोण असणार निशाण्यावर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापूरात सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापूरात सभा होणार आहे. दसरा चौकात मोठा मंडप उभारण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता शरद पवारांची दसरा चौकात तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोल्हापूरात शरद पवारांची सभा होणार आहे.
पवार या सभेतून कोणावर निशाणा साधतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सभेआधी कोल्हापुरातील दसरा चौकात 'बाप तो बापच . .' असा आशय लिहिलेलं बॅनर झळकलं आहे.
तसेच शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापूरमध्ये येतील त्यावेळी तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅली निघणार आहे.