राजकारण
पुणे विधानसभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला? 'या' नावाची चर्चा
राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विविध पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहरातील विधानसभा मतदार संघाची तयारी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हडपसर मतदारसंघातील उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. . महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले नसतानाही प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते आहे.