शिंदे-फडणवीसांवर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, आश्वासन न पाळल्यानं...

अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले होते. या आंदोलकांची शरद पवारांनी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

जालना : अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले होते. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या जखमी आंदोलकांची शरद पवारांनी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे. यानंतर शरद पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. सरकारनं दिलेलं आश्वासन न पाळल्यानं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही. शांततेच्या मार्गानं संघर्ष करु. सर्वांनी शांत रहावं, असे आवाहन शदर पवारांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com