मुंबईवरून सूचनेनंतर आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज : शरद पवार

मुंबईवरून सूचनेनंतर आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज : शरद पवार

जालन्यातील घटनेवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : जालन्यातील घटनेवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. शिंदे सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे आंदोलन सुरु झालं. मात्र, आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुसकावून लावलं. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलनस्थळी आले. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीहल्ला केला. आंदोलकांना माझा सल्ला आहे की त्यांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावं कारण हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

मुंबईवरून सूचनेनंतर आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज : शरद पवार
आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू...; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शरद पवार म्हणाले की, आज आम्ही तिघांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. लहान मुले, वडीलधाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. जखमी आंदोलनकर्त्यांनी माहिती दिली की आमची चर्चा सुरू होती अधिकारी बोलत होते मार्ग निघेल असे दिसत होते. मात्र जास्तीचे पोलीस तिथे बोलावण्यात आले. सर्व व्यवस्थित सुरू असताना मुंबईवरून सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टीकोण बदलला म्हणून त्यांनी बळाचा वापर सुरू केला. हवेमध्ये गोळीबार केला. लहान छऱ्यांचा वापर करण्यात आल्याचीही माहिती जखमींनी दिली.

चर्चा सुरू असताना असा बळाचा गैरवापर करणे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष बघितले नाही तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे यातून मार्ग काढावा तर आम्ही मराठा आरक्षणाचा विषय इंडिया आघाडीच्या बैठकीतही चर्चिला गेल्याचे त्यांनी सांगितले आणि जातीनिहाय जनगणना व्हावी याबाबतही चर्चा करण्यात आली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता की, गोवारी हत्याकांडावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. मग त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा का दिला नाही. तर यावर शरद पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. 1994 म्हणजेच 28 ते 30 वर्षापूर्वी गोवारींचे प्रकरण झाले तेव्हा मी मुख्यमंत्री होतो पण नागपुरात नव्हतो. मी मुंबईत होतो. तेव्हा आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी असे केले होते. आता कोण जबाबादारी घेतोय त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी मुंबईतील घटनेनंतर तेव्हाचे गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com