राजकारण
Sharad Pawar : महाविकास आघाडीत एकी, संभ्रम निर्माण करु नका
पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठक पार पडली.
पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठक पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, माझ्या आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत मी कालच भूमिका मांडली आहे. वारंवार प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करु नका. मविआत एकी आहे. संभ्रम नाही. आमच्या बैठकीबाबतही मी भूमिका मांडली आहे. असे शरद पवार म्हणाले.