Sharad Pawar : आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे
शरद पवार यांच्या दौऱ्याचा आज कोल्हापुरमध्ये दुसरा दिवस आहे. आज पवारांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष फुटीवर बोलले. शरद पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाची ही धोरणं आहेत की पक्ष फोडत आहेत. तुमचा विचार सोडा आणि आमच्यासोबत या, असं धोरण त्यांचं आहे. पक्षातील लोकांची नाव सभेत घेऊन त्यांचे महत्व कशाला वाढवायचं?
तसेच लोकांमध्ये जावून पक्षाची भूमिका सांगायची आहे. येत्या काळात जनता या सगळ्या गोष्टींना उत्तरं देईल. . आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पण हे लोक म्हणजे पक्ष नव्हे. आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, ही वस्तूस्थिती आहे. आमच्यातील काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला, ही वस्तूस्थिती आहे. पण या लोकांना राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारला असता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं त्यांनी उत्तर दिलं. असे शरद पवार म्हणाले.