Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

कांद्याचा मुद्दा संसदेत मांडणार; शरद पवारांची माहिती, शिंदे-फडणवीसांवर साधला निशाणा

कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात सरकारने कांदा उत्पादकांना काहीतरी दिले आहे आपल्या राज्यात फडणवीस-शिंदे केवळ चर्चा करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. कांद्याचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar
किरीट सोमय्या ईडीचे दलाल; अनिल परब यांचा निशाणा

कांदा उत्पादनाचा खर्च वाढतो आहे. कमी भावामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते आहे. शासकीय संस्थाना कांदा खरेदी करायला हवा. नाफेडने निर्यातीचा कार्यक्रम राबवावा. नाफेडने कांदा बाजार समितीत येऊन खरेदी करायला हवा. मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात सरकारने कांदा उत्पादकांना काहीतरी दिले आहे आपल्या राज्यात फडणवीस-शिंदे केवळ चर्चा करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. कांद्याचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सांगलीत शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. याचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत राज्याच्या इतिहासात असे घडले नाही. देशात आजपर्यंत शेतकऱ्यांची जात विचारली नाही. शेतकऱ्यांना जात विचारणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तर, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरपाई दिली पाहिजे.

दरम्यान, नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने शरद पवारांवर टीका करण्यात येत आहे. यावर शरद पवार म्हणाले की, आजपर्यंत सर्व पक्ष नागालँडमध्ये एकत्रित आले आहेत. या भागात नागा लोक देशविघातक कार्य करत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने ऐक्यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com