नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटाचा 
'तो' दावा शरद पवारांनी खोडला; म्हणाले...

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटाचा 'तो' दावा शरद पवारांनी खोडला; म्हणाले...

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्यास शरद पवारांनी सहमती दर्शवल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. परंतु, आता ठाकरे गटाचा हा दावा शरद पवारांनीच खोडून काढला आहे.

नाशिक : नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्यास शरद पवारांनी सहमती दर्शवल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. यानुसार उमेदवारासाठी प्रचार दौरे करण्याची मागणीही ठाकरे गटाने शरद पवारांकडे केली होती. परंतु, आता ठाकरे गटाचा हा दावा शरद पवारांनीच खोडून काढला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांचं मोठं विधान केले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटाचा 
'तो' दावा शरद पवारांनी खोडला; म्हणाले...
संजय राऊत चुXX झालाय; प्रसाद लाड यांची जीभ घसरली

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्यास शरद पवारांनी सहमती दर्शवल्याबाबातची माहिती ठाकरे गटाचे नेते सुनील बागुल यांनी दिली होती. शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहे म्हणून भेट घेतली. भविष्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. चारही पक्षांची चर्चा झाली, नाशिकचा उमेदवार शिवसेनेचा असेल. राष्ट्रवादी आग्रही असली तरी जागा शिवसेनेला सुटली आहे.

आम्ही प्रचारासाठी दौरे करावे अशी मागणी केली. ठाकरेंची शिवसेना देखील आंदोलनात सहभागी होईल. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे सुनील बागुल यांनी सांगितले होते. यामुळे नाशिकच्या जागेसाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती.

मात्र, शरद पवारांनी हा दावा खोडून काढला आहे. १९ तारखेला दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com