संजय राऊत चुXX झालाय; प्रसाद लाड यांची जीभ घसरली

संजय राऊत यांनी क्रिस्टल कंपनीवर केलेल्या आरोपानंतर प्रसाद लाड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांवर टीका करताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी क्रिस्टल कंपनीवर केलेल्या आरोपानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याला प्रत्युत्तर देताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली आहे. संजय राऊत सातत्याने माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहे. संजय राऊत चु* झालाय, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी घणाघात केला.

ज्या गोष्टीचा संबंध नाही, कोणत्या माहितीचा आधार नाही. कशामध्ये नाव घ्यायचं कशात नाही घ्यायचं, हे कळत नाही. अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे. आपल्या माध्यमातून मी संजय राऊत यांना सांगू इच्छितो, याच्यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे हे मी मीडियासमोर आणेल. त्याचे व्हिडिओ जनतेसमोर आणेल आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून, अब्रुनुकसानीचा किमान 200 ते 500 कोटींचा दावा संजय राऊतांवर उद्या सकाळपर्यंत दाखल करतोय, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com