राजकारण
धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच Sharad Pawar यांची तोफ धडाडणार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. शरद पवार यांच्या निशाणावर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी ही बॅनर्स लावले आहेत. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. असं त्यांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांची बीडच्या महालक्ष्मी चौकातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
शरद पवार यांची बीडमधील सभा अत्यंत भव्य होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सभेला 40 ते 45 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचे समजते.