अलीकडे मला संसदेत जायला भीती वाटते; शरद पवार असं का म्हणाले?

अलीकडे मला संसदेत जायला भीती वाटते; शरद पवार असं का म्हणाले?

18 वे जागतिक मराठी संमेलन पार पडत आहे. डॉ. डी वाय पाटील विद्यापीठात या संमेलनाचे उद्घाटन झाले.

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये 18 वे जागतिक मराठी संमेलन पार पडत आहे. डॉ. डी वाय पाटील विद्यापीठात या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार शरद पवार यांनी अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांच्या भेटीच्या आठवणी जागवल्या. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला आहे.

अलीकडे मला संसदेत जायला भीती वाटते; शरद पवार असं का म्हणाले?
'राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड, माझं नावही संजय राऊत आहे'

शरद पवार म्हणाले की, ज्ञानेश्वर मुळे यांच्याकडे जायचो. तेव्हा इलियाना नावाची रशियन स्त्री होती. ती असखलीत मराठी बोलत होती. ती पंढरीची वारीही करत होती. वारी म्हणजे आळंदीपासून सुरू होते आणि पंढरपूरला जाते ती वारी हे उत्तर इलियाना यांनी दिले. हे घडले मुळे यांच्या सानिध्यामुळेच, असे त्यांनी म्हंटले आहे.

सुशील कुमार शिंदे भाषणात म्हणाले मी त्यांच्याच तालमीत तयार झालो. अलीकडे अस कुणी म्हंटल तर मला भीती वाटते. कारण एकदा कोणी तरी म्हंटलं होते मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलो. अलीकडे मला संसदेत जायला भीती वाटते, असा अप्रत्यक्ष टोला शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

अलीकडे मला संसदेत जायला भीती वाटते; शरद पवार असं का म्हणाले?
माझ्या घातपाताच्या शक्यतेला केसरकरांनी दिली पुष्टी; सुषमा अंधारेंचा मोठा दावा

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून, त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवली, असे विधान पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com