Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

एकदा दृष्टी सुधारली की बरेचसे प्रश्न मिटतात; शरद पवारांचा राज्य सरकारला मार्मिक टोला

शरद पवारांच्या हस्ते कृष्णदृष्टी आय केअर ॲडव्हान्स हॉस्पिटलचे उद्घाटन

इंदापूर : इंदापूर शहरातील कृष्णदृष्टी आयकर ॲडव्हान्स हॉस्पिटलचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवारांनी डोळ्यांच्या ऑपरेशनचे किस्सा सांगितला. एकदा दृष्टी सुधारली आणि मग बरेचसे प्रश्न मिटतात. त्यामुळे कोण काय करते हे सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही, असे म्हणत शरद पवारांनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.

Sharad Pawar
'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'

एका महिन्यांपूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांच्या संबंधितांचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करायची गरज आहे. मी त्यांना म्हटलं की आत्ताच करून टाका. पण, डॉक्टरांनी सांगितलं की एकदम दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता येणार नाही. तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवले तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं होणार नाही. त्यामुळे एक तरी डोळा तुमचा उघडा ठेवला पाहिजे, असे शरद पवारांनी म्हणताच सगळीकडे हशा पिकला.

पाळीपाळीने आम्ही तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन करू आणि एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये त्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन केले. त्यांनी नक्की डोळ्यात काय बसवलं हे मला माहित नाही. त्यामुळे मला आता व्यवस्थित दिसतं. त्यामुळे कोण काय करतय याची सांगायची आणि माहिती घ्यायची गरज पडत नाही, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

मी थोडसं काळजी करतो कुठल्याही हॉस्पिटलच्या दवाखान्याचा उद्घाटन करायला बोलावून हे उत्तम चालावं. याचा अर्थ रोगी वाढावेत आणि रोगांची आवक या ठिकाणी वाढावी, असा त्याचा निष्कर्ष निघू शकतो. म्हणून बोलताना जपून बोलावं लागतं. पण, या हॉस्पिटलची अवस्था वेगळीआहे. हे चांगलं चालाव आणि चांगलं चालल्यानंतर बहुसंख्य लोकांची दृष्टी सुधारेल. आणि एकदा दृष्टी सुधारली आणि मग बरेचसे प्रश्न मिटतात, असे म्हटल्यानंतर सगळ्यांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी शरद पवारांनी राज्य सरकारला अप्रत्यक्षपणे मार्मिक टोला लागावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com