Devendra fadnavis | Rahul Gandhi
Devendra fadnavis | Rahul Gandhi Team Lokshahi

महात्मा गांधींचे पत्र शेअर करत देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना सवाल

हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ? क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?
Published by :
Sagar Pradhan

महाराष्ट्रात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. परंतु, या भारत जोडो यात्रेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. वक्तव्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. एकीकडे भाजपकडून राहुल गांधींवर जोरदार टीका केली जात आहे. त्यावरूनच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचे एक पत्र शेअर करत राहुल गांधींना प्रतिप्रश्न केला आहे.

Devendra fadnavis | Rahul Gandhi
खरा इतिहास काय हा समोर आला पाहिजे, राहुल गांधींच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राहुल गांधींनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहे. अशातच त्यांनी महात्मा गांधी यांचे एक पत्र ट्वीटरवर शेअर करत राहुल गांधींना प्रश्न विचारले आहे.

राहुल जी,

काल तुम्ही मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला सांगितलीस,

चला, आज मी तुम्हाला काही कागदपत्रे वाचून दाखवतो.

आमच्या आदरणीय महात्मा गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का?

त्यात त्याच शेवटच्या ओळी आहेत ज्या तुम्ही मला वाचायला हव्या होत्या?

#वीरसावरकर

आता प्रश्न असा पडतो की, वीर सावरकरांबद्दल वारंवार विधाने करून तुम्ही फक्त तुमच्या व्होट बँकेची काळजी करत आहात का?

किंबहुना त्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे.

#वीरसावरकर

त्याचप्रमाणे देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहे,

अशा निवडक गोष्टी वाचत राहिल्यास,

त्यामुळे देश तुम्हाला अनेक पिढ्या हा प्रश्न विचारत राहील,

अरे भाऊ, तुला काय म्हणायचे आहे?

#वीरसावरकर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com