पुण्यात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! शर्मिला येवलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; शिंदे गटात करणार प्रवेश

पुण्यात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! शर्मिला येवलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; शिंदे गटात करणार प्रवेश

ठाकरे गटाच्या अनेक आमदार आणि खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना आता युवासेनेतही मोठी फूट पडली आहे.

पुणे : ठाकरे गटाच्या अनेक आमदार आणि खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना आता युवासेनेतही मोठी फूट पडली आहे. पुण्यातून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील शर्मिला येवले यांच्यासह आज अनेक युवासेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर प्रवेश करणार आहेत.

पुण्यात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! शर्मिला येवलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; शिंदे गटात करणार प्रवेश
राज्यात राजकीय घडामोडींना वेग! फडणवीसांची अजित पवारांसोबत बैठक, राज ठाकरे अन् शिंदेंनाही भेटले

शर्मिला येवले या युवासेनेच्या सहसचिव होत्या. परंतु, काही दिवसांपूर्वी पक्षात आपल्याला काम करू दिले जात नसल्याचे सांगत येवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी त्यांची समजूत काढली होती. मात्र, काही दिवसांतच सामना वृत्तपत्रातून शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे शर्मिला येवले यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. अखेर आज शर्मिला येवले यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून युवासेनेच्या 20 पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

पुण्यात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! शर्मिला येवलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; शिंदे गटात करणार प्रवेश
परवानगी द्या अगर नका देऊ मोर्चा काढणारच : अजित पवार

कोण आहेत शर्मिला येवले?

प्रभावी भाषण शैली असलेल्या शर्मिला यांची ने मराठा क्रांती मोर्चात भाषण केले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेवर त्यांची नियुक्ती झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला. परंतु, २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईफेक केल्यानंतर शर्मिला येवले प्रकाशझोतात आल्या. येवले यांना ऑक्टोबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. यासाठी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला होता. पुढे युवासेनेचे पद त्यांना मिळाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com