भाजप आम्हाला सापत्न वागणूक देते; गजानन किर्तीकरांनी व्यक्त केली खंत

भाजप आम्हाला सापत्न वागणूक देते; गजानन किर्तीकरांनी व्यक्त केली खंत

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत संसार थाटला व मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर विराजमान झाले.

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत संसार थाटला व मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर विराजमान झाले. शिंदे गट व भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे आतापर्यंत चित्र होते. परंतु, शिंदे गटाच्या एका नेत्याने खंत व्यक्त केली आहे. भाजप आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचे शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी सांगितले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

भाजप आम्हाला सापत्न वागणूक देते; गजानन किर्तीकरांनी व्यक्त केली खंत
मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा; राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, घरात बसलेल्यांचे...

आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटक पक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे, असे गजानन किर्तीकरांनी सांगितले आहे. तर, 22 जागा आमच्या आहेतच. 2019 मध्ये आम्ही या जागा लढवल्या आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला होता. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणजे घरात बसलेल्यांचे मनोरंजन झाले आहेत. त्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही. बसल्या ठिकाणी कोट्या करतात त्यांच्या बोलण्यास काही गांभीर्याने घेण्याचा काम नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com