मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा; राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, घरात बसलेल्यांचे...

मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा; राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, घरात बसलेल्यांचे...

संजय राऊतांच्या टीकेवर शिंदे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले

मुंबई : मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. ते कधीही कोंबड्या कापल्या जातात, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला होता. यावर शिंदे गटाचे गजानन किर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणजे घरात बसलेल्यांचे मनोरंजन झाले आहेत त्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही, असा टोला किर्तीकरांनी राऊतांना लगावला आहे.

मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा; राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, घरात बसलेल्यांचे...
...म्हणूनच राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते संसदेचे उदघाटन नाही; आंबेडकरांचा दावा

काय म्हणाले होते संजय राऊत?

मी शिंदे-मिंधे यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहतच नाही. मिंधे गट हा भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात पाळलेले. ते कधीही कोंबड्या कापल्या जातात. सकाळ संध्याकाळ कोंबड्या आरवतच असतात. तसे ते करत आहेत. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? असे संजय राऊत म्हणाले होते.

गजानन किर्तीकरांचे प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणजे घरात बसलेल्यांचे मनोरंजन झाले आहेत. त्याच्या बोलण्यात काही अर्थ नाही. बसल्या ठिकाणी कोट्या करतात त्यांच्या बोलण्यास काही गांभीर्याने घेण्याचा काम नाही, असा निशाणा गजानन किर्तीकरांनी राऊतांवर साधला आहे. तसेच, 22 जागा आमच्या आहेतच. 2019 मध्ये आम्ही जागा लढवल्या आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com