शिंदे सरकारचा आज होणार मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नावांवर शिक्कामोर्तब

शिंदे सरकारचा आज होणार मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नावांवर शिक्कामोर्तब

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला आजचा मुहूर्त ठरला असून सकाळी 11 वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. परंतु, सुरुवातीला केवळ 20 ते 22 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला आजचा मुहूर्त ठरला असून सकाळी 11 वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. परंतु, सुरुवातीला केवळ 12 ते 13 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये भाजप आणि शिंदे गटतील कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ही नावे अखेर समोर आली आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानंतर सव्वा महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली. आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. भाजपचे 22 आमदार तर शिंदे गटाला 4 आमदारांमागे एक मंत्रिपद या सूत्राने 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहे. तर, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गृहखाते भाजपकडेच राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते. परंतु, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छोटे खानी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून 12-13 मंत्रीच आज शपथ घेणार आहे.

एकनाथ शिंदे गटातून दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, बच्चू कडू आणि भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित, रविंद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाची यादी पाहता भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईवर तर शिंदे गटाने मराठवाडा आणि इतर ठिकाणांवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे.

दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, पियुष गोयल यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com