Uday Samant
Uday SamantTeam Lokshahi

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. यादरम्यान, न्यायालयाने पुढील तारीख दिली.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. यादरम्यान, न्यायालयाने पुढील तारीख दिली असून 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

Uday Samant
नव्या वर्षातही तारीखच! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयावर भाष्य करणं चुकीचं आहे. सात न्यायमूर्ती खांपीठाकडे हे प्रकरण जावं असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. त्यांच्या दाव्यंकडे मी लक्ष देत नाही. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. 20 जूनपासून त्यांना धडकी भरली आहे. तिथले अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. तसेच, आम्ही सगळे पुरावे सादर केले आहेत. सरपंच, खासदार आमच्याकडे आहेत, असेही उदय सामंत यांनी म्हंटले आहे.

Uday Samant
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 'व्हेलेंटाईन डे'ला; संजय राऊत म्हणाले, सर्वकाही प्रेमाने...

तर, बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार यावर्षी होणारच नाही, असे सूचक विधान केले होते. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, जरी ते असं बोलले असतील तरी ते आमचे सहकारी आहेत. योग्य वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल. ते समंजस आहेत, लोकनेते आहेत. त्यांची समजूत काढतील. शिक्षक संघटनेच्या जागा भाजप आणि आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नवीन नवीन बातम्या रोज महाराष्ट्राला मिळत असतात. रोज सकाळचं हे झालं आहे. आम्हाला खूप काम आहेत, जनतेशी निगडीत काम आहेत. 9:30-10 चा एपिसोड मी पाहिलेला नाही, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com