शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने फोडले टाळे; ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने फोडले टाळे; ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक

शिंदे गटाकडून नेरळ शिवसेना शाखेवर ताबा मिळावण्याचा प्रयत्न; शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.

कर्जत : निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर राज्यभरात शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण आहे. अशातच, शिंदे गटाकडून नेरळ शिवसेना शाखेवर ताबा मिळावण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून नेरळ शहरातील ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.

शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने फोडले टाळे; ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक
'लोकशाहीच्या मुखवटय़ाआड पंतप्रधान मोदी हुकूमशाहीच चालवताहेत'

शिवसेना कोणाची यावर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर रायगड जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये जल्लोष होता. काही ठिकाणी या शिवसैनिकांनी फटाके फोडून तर ढोलताशा वाजवून आपला जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी गावागावात असलेल्या शिवसेनेच्या शाखेवर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ताबा मिळवण्याचा देखील प्रयत्न केला. असाच प्रयत्न जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथील शिंदे गटाने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बंद केला.

शिंदे गटाने शिवसेना शाखेचे कुलूप हातोडीने फोडले व शाखेत प्रवेश करत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय शाखेला नव्याने कुलूप लावले. यावरुन ठाकरे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याबाबत ठाकरे शिवसैनिकांनी शाखेचे कुलूप फोडणाऱ्यांविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com