शहाजी बापू पाटलांचा नवा लूक पाहिलात का?

शहाजी बापू पाटलांचा नवा लूक पाहिलात का?

सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आता नव्या रुपात लोकांसमोर आले आहेत.

अभिराज उबाळे | पंढरपूर : सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आता नव्या रुपात लोकांसमोर आले आहेत. तब्बल सव्वाशे किलो वजन असलेल्या आमदार पाटील यांनी एका आयुर्वेदीक हॉस्पिटलमध्ये जाऊन वजन कमी केले आहे. त्यांच्या नव्या रुपाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हिवाळी अधिवेशनात दोन दिवस सहभागी झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपले मित्र महेश पाटील यांच्या सोबत थेट कर्नाटकामधील श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटल या ठिकाणी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले.

बंगळुरूमधील आश्रमातील शहाजी बापू यांचा दिनक्रम 24 डिसेंबर रोजी दाखल झाले आहेत. आठ दिवस पहाटे पाच वाजता उठून दोन तास योगासने करणे. उकडलेल्या पालेभाज्यांचा आहार घेणे. शिवाय ध्यान, धारणा आणि व्यायामही केला. शनिवारी त्यांचा हा वेटलॉस कोर्स पूर्ण झाला. उद्यापासून पुन्हा ते सांगोला तालुक्यातील मतदार संघात येणार आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. यादरम्यानच्या काळात आमदार शहाजी बापू पाटील मात्र त्यांच्या डायलॉगमुळे चांगलेच प्रसिध्द झाले होते. काय डोंगर.. झाडी..हाटिल.. हा शहाजी बापूंचा डायलॉग सर्वांनाच पाठ आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com