Uday Samant
Uday SamantTeam Lokshahi

मोठी बातमी! उद्योगमंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले; भर समुद्रातच...

स्पीड बोटीच्या सर्वच यंत्रणा बंद पडल्यामुळे समुद्रात स्पीड बोट भरकटली

प्रशांत गोडसे | मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले. रायगड जिल्ह्यातील मांडवा ते मुंबईतील गेट वे ॲाफ इंडिया स्पीड बोटीने प्रवास करत असताना भर समुद्रातच स्पीड बोट बंद पडली. बंद पडलेल्या स्पीड बोटीची सर्वच यंत्रणा बंद पडल्यामुळे स्पीड बोटीच्या कॅप्टनला रेस्कूसाठी एसओएस हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे अशक्य झाले होते. दरम्यान, उदय सामंत सुरक्षित असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

Uday Samant
सुनावणी दरम्यान ठाकरे गट अन् शिंदे गटात शाब्दिक चकमक, निवडणूक आयुक्तांनी केली मध्यस्थी

उदय सामंत अलिबाग ते मुंबई असा प्रवास स्पीड बोटीने करत होते. समुद्रात प्रवासा दरम्यान यांच्या स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. यामुळे समुद्रातील लाटांमुळे स्पीड बोट भरकटली गेली. त्यातच बंद पडलेल्या स्पीड बोटीच्या सर्वच यंत्रणा बंद पडल्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ एसओएस हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठीण झाले होते. भर समुद्रात अशा संकट प्रसंगी उदय सामंत यांच्या स्वीय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही तात्काळ प्रयत्नं करून दुसरी स्पीड बोट मागवली.

दुसरी बोट काही वेळातच घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाली. त्यामुळे भर समुद्रात भरकटत चाललेल्या स्पीड बोटीला दुसऱ्या बोटीने काठावर आणण्यात आले. दरम्यान, उदय सामंत हे आता मुंबईत सुखरूप परत आल्याची माहिती मिळतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com