Supriya Sule | Abdul Sattar
Supriya Sule | Abdul SattarTeam Lokshahi

अब्दुल सत्तारांना सुळेंबद्दल केलेले 'ते' विधान भोवणार; महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले विधान आता सत्तार यांना चांगलेच महागात पडणार

मुंबई : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार मागील यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले विधान आता सत्तार यांना चांगलेच महागात पडणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी सत्तार यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Supriya Sule | Abdul Sattar
पृथ्वीराज चव्हाण खोटारडा नंबर एक; प्रकाश आंबेडकरांचे कॉंग्रेसवर टीकास्त्र

अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगलेच चर्चेत येत होते. परंतु,अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य करताना शिवागाळ केली. सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून करण्यात येत होती. तर, भाजप नेत्यांनीही सत्तारांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना शेवटचा इशारा दिला. यानंतर सत्तार चांगलेच अलर्ट झाले होते. परंतु, त्यांच्या अडचणीत आता भर पडली आहे.

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा वापरल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात वकील इंद्रपाल सिंह यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने कांदिवली पोलिस स्टेशनला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पोलिसांनी वकील इंद्रपाल सिंह जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. यानंतर सत्तार यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

काय केले होते सत्तारांनी वादग्रस्त विधान?

सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. तर, सत्तारांनी इतकी भि***ट झाली असेल तिलाही देऊ, अशा शब्दात उत्तर दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com