शिंदे गटातील आमदार गायकवाडांचा भाजपला इशारा; म्हणाले, एक दिवस दोन्ही पक्षात...
राज्यात सध्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात वादंग उठले आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त केले. तर भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले. ह्या सर्व विधानांमुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड भाजपला इशारा दिला आहे.
काय म्हणाले गायकवाड?
''भाजपच्या नेत्यांनी विचार करुन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलायला होवं. असा आपमान सहन केला जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल. त्यानंतर होणारे परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील'', असा थेट इशारा बु आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला दिलाय.
पुढे ते म्हणाले की, ''ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहिती नाही, त्यांना या राज्याच्या खुर्चीवर ठेऊन काही उपयोग नाही. या खुर्चीवर मराठी मातीतला माणूस पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविला. अशा महान व्यक्तीबद्दल राज्यपालांनी असं बोलणं योग्य नाही, म्हणून या राज्यपालांना कुठे पाठवायचे तिथे पाठवा'', असं गायकवाड म्हणाले.