Bhavana Gawali | Aditya Thackeray
Bhavana Gawali | Aditya Thackeray Team Lokshahi

महाराष्ट्र तर तुम्हाला..., आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर शिंदे गटाची बोचरी टीका

लालू प्रसाद यादव यांनी तर हिंदूत्वाला विरोध केला होता आणि आता आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना का भेटायला जात आहेत
Published by  :
Sagar Pradhan

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज बिहारचा एकदिवशीय दौऱ्यावर होते. या दौऱ्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. यावरच आता शिंदे गटाने या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाकडे गेलेल्या खासदार भावना गवळी यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला राज्य सांभाळता आले नाही आणि तुम्ही बिहार दौरा का करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Bhavana Gawali | Aditya Thackeray
वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांचे सूर बदलले, शिवरायांबद्दल उच्चारले गौरवोद्गार

नेमकं काय म्हणाल्या भावना गवळी?

आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावर बोलताना खासदार भावना गवळी म्हणाल्या की, महाराष्ट्र तर तुम्हाला सांभाळता आलेला नाही.आणि आपण बिहारमध्ये जात आहात. त्यावरूनच सगळं आलेले आहे. पहिला आपले घर सांभाळा, ते घर काही तुम्हाला सांभाळता आलेले नाही. आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता की, तुम्ही गद्दार आहात. पण तुम्हालाच आम्हाला सांभाळता आलेलं नाही. त्यामुळे खरे गद्दार तर तुम्ही आहात अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

आमच्यावर गद्दार म्हणून टीका करताना हे तुम्हाला किती शोभणारं आहे असा विचार आता त्यांनीच केला पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहार दौरा निश्चित केल्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर भाजपनेही या संधीचा फायदा घेत, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. लालू प्रसाद यादव यांनी तर हिंदूत्वाला विरोध केला होता आणि आता आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना का भेटायला जात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थि केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com