Uddhav Thackeray | Naresh Mhaske
Uddhav Thackeray | Naresh MhaskeTeam Lokshahi

'....त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला' शिंदे गटाची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका

अंबादास दानवे यांची संभाजीनगरमध्ये नगरसेवक होण्याची पात्रता नाही.

राज्यात एकीकडे अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेतील दोन्ही गटातील वाद उफाळून बाहेर येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली होती. त्यावरच आता शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. अंबादास दानवे यांची संभाजीनगरमध्ये नगरसेवक होण्याची पात्रता नाही. अशा शब्दात त्यांनी जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray | Naresh Mhaske
शिंदे- फडणवीस सरकारकडून जाहिरातींसाठी कोट्यवधींची उधळपट्टी, माहितीच्या अधिकारातून प्रकार उघडकीस

नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?

जितेंद्र आव्हाड प्रभू रामचंद्र आणि रावण, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिस्तेखान आणि औरंगजेब यांची तुलना करतात, त्या माणसांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात त्यामुळे त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. ठाकरे गटाला आता शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट असं म्हणायला यांना लाज वाटते. त्यामुळे ही लोकं बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय म्हणायला लागले. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याच्याबद्दल यांनी प्रथम बोलावं. अशी टीका म्हस्के यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, ज्या संभाजीनगरमधून विधान परिषदेवर अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडून आले आहेत. त्यांना तिकडे कोण विचारतं, आणि त्यांची नगरसेवक तरी होण्याची त्यांची पात्रता नाही. अशी बोचरी टीका नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत म्हणून काय झालं. मलंगड यात्रेत ते येऊ शकले असते.मात्र, त्यांना घरात बसून हिंदुत्व टिकवायचं आहे. फक्त मतांकरिता हिंदुत्वाची भाषा करायची आहे. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आली की त्यावेळेसच फक्त तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता त्यामुळे त्यांनी हा विचार करू नका. अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com