'बाळासाहेब ठाकरेंचे पुत्रच हिंदूंच्या सणाला विरोध करतात, जनता माफ करणार नाही'

'बाळासाहेब ठाकरेंचे पुत्रच हिंदूंच्या सणाला विरोध करतात, जनता माफ करणार नाही'

शिंदे गटाचे आमदार किरण पावसकर यांचे उध्दव ठाकरेंवर शरसंधान

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचे पुत्रच हिंदूंच्या सणाला विरोध करतात, जनता माफ करणार नाही, अशी टीका शिंदे गटाचे आमदार किरण पावसकर यांचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर केली आहे. तसेच, शिवसेना-शिंदे गटाच्या राडादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. यावर गणेश चतुर्थीला दहा दिवस आनंद दिला यासाठी अटक करायची आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

किरण पावसकर म्हणाले की, अनंत चतुर्थीच्या दिवशी सण फार चांगल्या आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. यंदा सगळी भडास लोकांनी काढली. तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा महाराष्ट्रच्या जनतेला आनंद देऊ शकला नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्रच हिंदूंच्या सणाला असा विरोध करतात. महाराष्ट्रची जनता माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. स्वतः वर्षावर बसायचं आणि मुलाला वेगळा बंगला द्यायचा, असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

एका शाखाप्रमुखाला मारण्यासाठी तुम्ही आलात काय, शिवसैनिक उरलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करायची गरज आहे. सदा सरवणकर यांनी गोळीबार केला हा बालिशपणाचा आरोप आहे. सदा सरवणकर यांना सुरक्षा आहे पोलिस होते ते कसे गोळीबार करतील. सदा सरवणकर असे काही करतील असा मला बिलकुल वाटत नाही. असा कुठलाही प्रकार घडला नाही मग अटक कशासाठी. गणेश चतुर्थीला दहा दिवस आनंद दिला यासाठी अटक करायची आहे का, असा सवालही किरण पावसकरांनी शिवसेनेला विचारला आहे.

खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे बंड केलं पाहिजे. ज्या शाखाप्रमुखांची चेन खेचली ती त्यांनी आणून द्यावी, असा आरोप त्यांनी केला आहे. कोरोना काळात इतकं घेतलं आहे की आता ते परत करा, असा निशाणाही पावसकरांनी साधला आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीचे रुपांतर माराहाणीत झाले होते. यानंतर 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 5 जण अटक करण्यात आली आहे. यानंतर आज पुन्हा दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. व शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com