पैसे घेऊन सत्तातंर घडविले, माझ्याकडे पुरावे; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

पैसे घेऊन सत्तातंर घडविले, माझ्याकडे पुरावे; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

शिवसेना आमदाराचे थेट शिंदे सरकारला आव्हान

अमोल नांदुस्कर | अकोला : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. व शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. परंतु, राज्यात अद्यापही राजकीय गोंधळ कायम असून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच, पैसे घेऊन सत्तातंर घडविण्यात आले आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार नितीन देशमुखांनी केला आहे. ते अकोला येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पाच दिवसांपूर्वी माझ्याविरोधात लाचलुपत विभागाची चौकशी लावण्यात आली. पोलीस महानिरीक्षकांनी तुमचं काही असेल तर वर जाऊन भेटा असं मला सांगितलं. ईडीची चौकशी लावली तर समाजात माझी इज्जत वाढली असती. माझ्या मुलाला चांगलं स्थळ येईल, असा मिश्कील टोला नितीन देशमुख यांनी लगावला.

ठाकरे सरकार पाडण्याचे षडयंत्र हे दीड वर्षांपासून सुरू होते. पैसे घेऊन सत्तातंर घडविण्यात आले आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट नितीन देशमुखांनी केला आहे. त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीच्या कारवाया केल्या तर माझ्या जवळीही क्लिप आहेत. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या क्लिप माझ्याकडे आहेत. या महाराष्ट्रात पैसे देऊन सत्तातंर झालं हे मी सिद्ध करू शकलो नाही. तर, महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेल, असे विधान नितीन देशमुखांनी केलं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com