ठाकरे गटाला नागपुरात मोठा धक्का;  उपजिल्हाप्रमुखांचा राजीनामा

ठाकरे गटाला नागपुरात मोठा धक्का; उपजिल्हाप्रमुखांचा राजीनामा

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. परंतु, याआधी उमेदवारीवरुन मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले.

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. परंतु, याआधी उमेदवारीवरुन मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. ही जागा कॉंग्रेससाठी सोडल्याने ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी काल अर्ज मागे घेतला. त्यामुळे पूर्व विदर्भातील शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. अशातच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाला नागपुरात मोठा धक्का;  उपजिल्हाप्रमुखांचा राजीनामा
...म्हणजे महाराष्ट्रातील ‘करणी टोळी’चे अघोरी प्रयोग; शिवसेनेचा घणाघात

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत झालेल्या सुरुवातीच्या वाटाघाटीत नागपूरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली होती. त्यानुसार नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्यजित तांबेंमुळे नाशिक विभागात काँग्रेसवर नामुष्कीची वेळ आली. यामुळे जागेत फेरबदल करत नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. यामुळे शेवटच्या क्षणी गंगाधर नाकाडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. गंगाधर नाकाडे यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. परंतु, नेतृत्वाने जागा सोडायला लावल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपजिल्हा प्रमुख दिलीप माथनकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. दिलीप माथनकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. पक्षाला आपला उमेदवार कायम राखता आला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची कोंडी करत आहेत, असा आरोपही दिलीप माथनकर यांनी लावलेला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूरचे पदाधिकारी सतीश इटलीवर हेही शिक्षक मतदार संघामध्ये उभे आहेत. परंतु, त्यांनी अर्ज वापस घेतला नाही. यावरुन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com