राजकारण
तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस…; ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोहेंबरला अकरावा स्मृतिदिन आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोहेंबरला अकरावा स्मृतिदिन आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे आणि ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
ठाकरे गटाकडून देखील बॅनर लावले गेले आहे. कालचा जो वाद झाला त्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बॅनरवर तू लढला नाहीस तरी चालेल परंतु तू विकला जाऊ नकोस तू विकला गेलास तर समाज कमजोर होईल, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या बॅनरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.