Aditya Thackeray
Aditya Thackeray Team Lokshahi

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे

राहुल गांधींच्या या यात्रेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या यात्रेत सहभागी झाले

सध्या काँग्रेसच्या वतीने देशभरात भारत जोडो यात्रा सुरु आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेत राहुल गांधी सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या भारत जोडो यात्रेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षही सहभागी झालाय. शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या यात्रेला हजेरी लावली आहे.

भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमधून हिंगोलीत पोहोचली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले. राहुल गांधींच्या या यात्रेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या यात्रेत सहभागी झाले.काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातला पाचवा दिवस आहे. या यात्रेला महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणखी काही नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com