balasahebanchi shivsena
balasahebanchi shivsenaTeam Lokshahi

शिंदे गटाच्या नव्या नाव, चिन्हासह श्रीकांत शिंदेंचे लक्षवेधी ट्वीट

आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार

उद्धव ठाकरे गटासोबतच निवडणुक आयोगाने ढाल-तलावर हे चिन्ह दिले आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर केले आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत गट शिंदे गट ढाल-तलवार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या मशालीला सामोरं जाणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधी ट्विट केले आहे. श्रीकांत शिंदेंसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक पोस्टर रिलीज केले आहे.

balasahebanchi shivsena
चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ढाल-तलवार मराठमोळी...

शिवरायांचा विचार, हिंदुत्वाचा आधार,दुर्जनांचा संहार, शिवसेनेची ढाल-तलवार... हिंदुत्वाला धार जिथे, जिथे शिवरायांचा विचार...आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार,हाती आमच्या ढाल आणि तलवार... असं चिन्हाचे ट्वीट श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार….

सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार….

#बाळासाहेबांची_शिवसेना

निशाणी : #ढाल_तलवार

असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com