शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आंबेगावच्या मंचरमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशावेळी लोकसभेची उमेदवारीची घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यावेळी शिवसेनेतील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी होणा-या सभेत शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

आज दुपारी साडेतीन वाजता होणार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी भव्य मेळावा होणार आहे. मेळाव्यातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com