आदित्य ठाकरे कुणाला म्हणाले शी? ज्युनिअर ठाकरेंचा रोख नक्की कुणाकडे?
राज्यात नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये सुरू असताना भाजप आमदार नितेश राणेंनीही एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. नितेश राणेंनी चक्क मतदारांनाच धमकी दिलीय. ग्रामपंचायतीच्या प्रचारात त्यांच्या उमेदवार विजयी झाली नाही तर, या शब्दात इशारा दिलाय. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादाचा धुरळा उडवला. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नितेश राणेंना एक शब्दात सुनावलाय.
भाजप आमदार नितेश राणेंच्या वरील वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. त्या टिकेलाही त्यांनी पुन्हा वादग्रस्त उत्तर दिलं. अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी राणेंसंदर्भात प्रश्नाला उत्तर दिलं. त्यांनी एका शब्दात 'शी' असा उल्लेख केला. 'शी' त्यांच्याबद्दल काय बोलायचं, असं सांगून प्रश्नाला पूर्णविराम दिला.
भाजप नेते नितेश राणे वारंवार आदित्य ठाकरेंवर टिका करताना दिसतात. दिशा सॅलियनच्या मृत्युनंतर त्यांच्या आरोपाचा रोख थेट आदित्य ठाकरेंवर होता. या शिवाय नितेश राणे अनेकदा पेंग्विनच्या चिडवताना दिसतात. एवढंच कशाला गेल्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून म्याव म्याव, असा आवाज काढून खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न केला होता.