Aditya Thackeray
Aditya Thackeray Team Lokshahi

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, माध्यमांसमोर दोघं एकत्र चर्चेला सामोरं जाऊ...

वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाईस असेल किंवा इतर हे सगळे प्रकल्प आपल्या राज्यातून गेलेच कसे यावर चॅलेंज करावं.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. विरोधक आणि सत्ताधारी रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने एकमेकांसमोर उभा ठाकत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा आव्हान दिले आहे. महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले याबाबत प्रसारमाध्यमांसमोर एकत्र चर्चेला या. दोघं एकत्र चर्चेला सामोरं जाऊ, असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

Aditya Thackeray
नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजप पक्ष चोरबाजार, तर...

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाईस असेल किंवा इतर हे सगळे प्रकल्प आपल्या राज्यातून गेलेच कसे यावर चॅलेंज करावं. इतर लोकं नुसता आरोप करतात. मध्यंतरी टाटाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्रात येण्यासारखं वातावरण नाही, असं सांगतिलं. पण त्या उच्च अधिकाऱ्याचं नाव अजून समोर आलेलं नाही. कोण बोललं ते कळलेलं नाही”, असे देखील ते म्हणाले.

हे सगळं होत असताना वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल मी काही दिवसांपूर्वी बोललो होतो. वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्याचं आता दु:ख नाही. पण जो प्रकल्प आपल्याकडे येत होता तो ऐनवेळेला दुसऱ्या राज्यात जातो, कमी विकसित एमआयडीसीत जातो तेव्हा त्याला सुरु व्हायला सहा-सात वर्ष लागतो. याच प्रकल्पाबाबत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ४ लाख कोटी घेऊन वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प येणार असं म्हटलं होतं. एमआयडीसीच्या जर्नलमध्ये 1 लाख कोटी घेऊन येणार असं आलं होतं. उपमुख्यमंत्र्यांनीदेखील ट्विट केलेलं, बैठका घेतलेलं. हे सगळं झालं असलं तरी जेव्हा आम्ही हा विषय आला तेव्हा हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार काळातच गुजरातला गेला असा आरोप करण्यात आला. असे आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com