Ramdas Kadam | Bhaskar Jadhav
Ramdas Kadam | Bhaskar JadhavTeam Lokshahi

रामदास कदमांची भास्कर जाधवांवर जहरी टीका; म्हणाले, जाधव म्हणजे बेईमान औ...

विधानसभा निवडणुकीत मी पाच जाहीर सभा घेतल्या त्यांना निवडून आणला पण त्याला एवढं माज आणि मस्ती आहे तो सापासारखा आहे.

निसार शेख|रत्नागिरी: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची खेड येते जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत जोरदार टीका केली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर देखील टीका केली होती. यासोबतच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील रामदास कदमांवर सडकून टीका केली होती. परंतु, ठाकरेंच्या या सभेनंतर ठाकरे गट विरूध्द कदम असे युध्द पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर विखारी केली आहे.

Ramdas Kadam | Bhaskar Jadhav
H3N2 Alert : आरोग्यमंत्र्यांचे जनतेला महत्वपूर्ण आवाहन; म्हणाले, रूग्ण वाढत...

काय म्हणाले रामदास कदम?

माध्यमांशी बोलताना कदम म्हणाले की, कोकणचा इतिहास असा आहे ज्याच्या घरी आपण एक ग्लास पाणी पितो त्याची आठवण सुध्दा ठेवतो ज्या झाडाच्या सावली खाली बसतो त्याची आठवण सुध्दा ठेवतो असा कोकणचा इतिहास आहे ही कोकणची संस्कृती आहे. पण भास्कर जाधव सारखा नीच आणि हरामखोर खाल्लेल्या घराची वासे मोजनारी औलाद जगात कुठेही मिळणार नाही, हा भास्कर जाधव म्हणजे बेईमान औलाद आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत मी पाच जाहीर सभा घेतल्या त्यांना निवडून आणला पण त्याला एवढं माज आणि मस्ती आहे तो सापासारखा आहे. एसान फरामोस इतका आहे. एका पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याला आर्थिक मदत केली होती. कपडे, टेम्पो, गाड्या सगळे 15 दिवस दिले होते. त्याची ओळख पण त्याला नाही. तो सडक्या मेंदुचा भास्कर जाधव असल्याची जहरी टीका रामदास कदम यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com