Ramdas Kadam | Uddhav Thackeray
Ramdas Kadam | Uddhav ThackerayTeam Lokshahi

रामदास कदमांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका; अफजल खानशी तुलना करत म्हणाले...

भास्कर जाधव सारखा नीच आणि हरामखोर खाल्लेल्या घराची वासे मोजनारी औलाद जगात कुठेही मिळणार नाही, हा भास्कर जाधव म्हणजे बेईमान औलाद आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची खेड येते जाहीर सभा पार पडली. या सभेत ठाकरेंनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीका केली. यासोबतच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील रामदास कदमांवर सडकून टीका केली होती. परंतु, ठाकरेंच्या या सभेनंतर ठाकरे गट विरूध्द कदम असे युध्द पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Ramdas Kadam | Uddhav Thackeray
बावनकुळेंच्या 'त्या' विधानावर शिरसाटांचा पलटवार; म्हणाले, आम्ही काही मूर्ख...

काय म्हणाले रामदास कदम?

माध्यमांशी बोलताना कदम म्हणाले की, कोकणचा इतिहास असा आहे ज्याच्या घरी आपण एक ग्लास पाणी पितो त्याची आठवण सुध्दा ठेवतो ज्या झाडाच्या सावली खाली बसतो त्याची आठवण सुध्दा ठेवतो असा कोकणचा इतिहास आहे ही कोकणची संस्कृती आहे. पण भास्कर जाधव सारखा नीच आणि हरामखोर खाल्लेल्या घराची वासे मोजनारी औलाद जगात कुठेही मिळणार नाही, हा भास्कर जाधव म्हणजे बेईमान औलाद आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत मी पाच जाहीर सभा घेतल्या त्यांना निवडून आणला पण त्याला एवढं माज आणि मस्ती आहे तो सापासारखा आहे. एसान फरामोस इतका आहे. एका पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याला आर्थिक मदत केली होती. कपडे, टेम्पो, गाड्या सगळे 15 दिवस दिले होते. त्याची ओळख पण त्याला नाही. तो सडक्या मेंदुचा भास्कर जाधव असल्याची जहरी टीका रामदास कदम यांनी केली.

पुढे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, अफजल खान जसा लाखो लोक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून आला, अगदी तसेच उद्धवजी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. 19 मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा टोला देखील रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com