'राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड, माझं नावही संजय राऊत आहे'

'राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड, माझं नावही संजय राऊत आहे'

शिवसेना नेते संजय राऊत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शाब्दिक वाद रंगला

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शाब्दिक वाद रंगला आहे. राऊतांचा परत तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असे नारायण राणेंनी म्हणताच संजय राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. अशातच संजय राऊतांनी नारायण राणेंना सज्जड दमच दिला आहे.

'राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड, माझं नावही संजय राऊत आहे'
माझ्या घातपाताच्या शक्यतेला केसरकरांनी दिली पुष्टी; सुषमा अंधारेंचा मोठा दावा

संजय राऊत म्हणाले की, आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्यापासून त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले आहे. त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझे नाव संजय राऊत आहे. राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड. कुठे येऊ, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजन्सीला घाबरत नाही, असा दमच त्यांनी राणेंना दिला आहे.

'राणे तुम्ही गुंड तर मी महागुंड, माझं नावही संजय राऊत आहे'
राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय महाराष्ट्राच्या...; मिटकरींनी सुनावले खडे बोल

काय म्हणाले होते नारायण राणे?

मी २६ डिसेंबरच्या अग्रलेखाचे कात्रण जपून ठेवले आहे. ते कात्रण मी माझ्या वकिलांकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणार नाही, दखल घेणार आहे. प्रत्येक गोष्ट आणि वाक्य माझ्या लक्षात राहते. हा माझा वाईट स्वभाव आहे. मी संजय राऊत यांना सोडणार नाही. यासोबतच मी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करेन. मी त्यांच्या तुरुंगात परत जाण्याचा रस्ता मोकळा करतोय, असा निशाणा नारायण राणे यांनी संजय राऊतांवर साधला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com