राजकारण
MLA disqualification : शिंदे की ठाकरे, कुणाचे आमदार अपात्र ठरणार? आज सुनावणी
आज विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू होणार आहे.
आज विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रता प्रकऱणाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.
शिवसेना (शिंदे गट) 40 आणि उबाठा 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकील आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील.ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकील आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुंबईतील कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे आमदार विधीमंडळाच्या सभागृहात सुनावणीसाठी येणार आहेत.