Sanjay Shirsat | Priyanka Chaturvadi
Sanjay Shirsat | Priyanka ChaturvadiTeam Lokshahi

'प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी' का म्हणाले शिरसाट असे?

प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Published by :
Sagar Pradhan

एक वर्षापूर्वी शिवसेनेते बंडखोरी झाली. त्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. परंतु दोन्ही गट कायम एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतात. दरम्यान शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली. याच सभेत बोलत असताना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. चतुर्वेदींच्या याच टीकेला आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Shirsat | Priyanka Chaturvadi
31 July 2023 Dinvishesh : 31 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

काय म्हणाले शिरसाट?

प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, 'उद्धव ठाकरेंची ती सभा उत्तर भारतीयांसाठी नव्हती, त्या सभेत काही शिवसैनिक आणि काही उत्तर भारतीय होते. टीव्हीवर आलेल्या व्हिडीओत ते पाहू शकता. त्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या उत्तर भारतीयांबरोबर हिंदीत कोण बोलेल असा विचार करून राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींनी भाषण केले.' असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, 'प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले होतं. ते असे म्हणाले होती की, ‘आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली’, अस त्यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com