Sanjay Shirsat | Sanjay Raut
Sanjay Shirsat | Sanjay RautTeam Lokshahi

'पक्ष बुडवायला निघालेल्या नेत्याबद्दल आम्हाला सहानुभूती' शिरसाटांनी राऊतांना डिवचले

महाराष्ट्रातला एका पक्षाच्या एकी इतका मोठा जबाबदार नेता पक्ष बुडवायला निघाला. त्याच्याबद्दलची आम्हला सहानुभूती आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आणखीच तीव्र झाला आहे. हा वाद सुरु असताना अशातच ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिंदे गटाकडून आता जोरदार प्रत्युत्तर देण्याचे सत्र सुरु आहे. त्यातच आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना इशारा देत बोचरी टीका केली आहे.

Sanjay Shirsat | Sanjay Raut
'राऊतांचे आडनाव बदलून संजय आगलावे असे ठेवायला पाहिजे'; शिंदे गटाची राऊतांवर जोरदार टीका

काय म्हणाले संजय शिरसाट?

मुंबईत माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत टीका केली आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या तब्बेतीची आम्हला काळजी आहे. महाराष्ट्रातला एका पक्षाच्या एकी इतका मोठा जबाबदार नेता पक्ष बुडवायला निघाला त्याच्याबद्दलची आम्हाला सहानुभूती आहे. म्हणून त्याच्या तब्बेतीला काही होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतो. मी तर नाही घेत म्हणून आम्ही घेतो. त्यामुळेच आम्ही त्यांना सायलेन्स झोनमध्ये पाठवणार आहोत. संजय राऊत स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत नाहीत. सायलेन्स झोनमध्ये ते असावेत त्यांनी कुठलाही आवाज करू नये अशी आमची भूमिका आहे. अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com