Deepak Kesarkar
Deepak KesarkarTeam Lokshahi

बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान कुणीही केला नाही- दीपक केसरकर

एकनाथ शिंदेंचा अपमान झाला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंनी विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवंय का? तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. या गोंधळाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतल्या बंडखोरीमुळे झाले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. त्यामुळे शिवसेनेतील या दोन गटांमध्ये अभूतपूर्व असं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री आणि शिंदे गट प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Deepak Kesarkar
'त्या' विधानामुळे सपा नेते अबू आसिम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

काय म्हणाले दीपक केसरकर?

एकनाथ शिंदेंचा अपमान झाला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंनी विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवंय का? तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं की आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा रीतीने केली जात आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कुणी काय केलं, याचा खुलासा येत्या दोन-चार दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

पुढे त्यांनी भारत जोडो यात्रेत झालेल्या संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, हिंदुस्थानवर जो प्रेम करतो, तो हिंदू आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांना जी काँग्रेस विरोध करत होती, त्यांना काश्मीरमध्ये जाऊन भेटणं एवढा मोठा अपमान बाळासाहेब ठाकरेंचा कुणीही केला नाही तो संजय राऊतांनी केला असं मला वाटतं. त्यामुळेच जे लोक सत्तेसाठी काँग्रेसचे पाय धरतात, राष्ट्रवादीच्या मागे मागे धावतात, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. असं दीपक केसरकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com