Shambhuraj Desai | Sanjay Raut
Shambhuraj Desai | Sanjay RautTeam Lokshahi

राऊतांच्या त्या टीकेवर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर; तीन महिने आराम केला आता पुन्हा...

आम्ही दगडच, हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंची झाली. त्यामुळे या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसली. त्यातच जयंतीनिमित्त आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. याच मेळाव्यात बोलत असताना शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यावरच आता शिंदे गट आमदार शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Shambhuraj Desai | Sanjay Raut
फडणवीसांनंतर राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, राजकीय आदेश...

काय म्हणाले शंभूराज देसाई?

राऊतांच्या विधानांवर प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, संजय राऊत यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही. त्यांना आम्ही विकासकामे करून उत्तर देऊ. तर काही महिन्यांपूर्वी असेच काही तरी राऊत बोलत होते आणि नंतर त्यांनी तीन महिने आराम केला, पुन्हा ती वेळ आली असे वाटते पुन्हा आराम करायची वेळ आलीय हे चक्र चालूच ठेवले पाहिजे अस वाटतंय.

काय म्हणाले होते राऊत?

शिवसेना अभेद्य आहे. दुसरी शिवसेना निर्माण नाही होणार. आपण पुरून ऊरू त्यांना. पक्ष असा चोरता नाही येणार. देवाची मुर्ती चोरणारा तो मुर्ती विकतो. हे मुर्तीचोर आहेत. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येते व जाते. त्याचे अस्तित्वही दिसत नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. आज चौथे चाक लागलंय. दोन स्टेफनीही तयार आहेत. आम्ही दगडच, हे ४० दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात शिवसेना म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. शिंदे-मिंधे काही नाही. असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com